जागतिक महिला दिन : २०२२
e Content Development (Digital Teaching Tools) Workshop
Place of Training : I.T.I.( Girls) , Aundh- Pune
Period : 22nd and 23rd March 2022
मा.चंद्रकान्त निनाळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांचे अभिनव संकल्पनेतून जागतिक महिला दिन निमित्त कौशल्यावर आधारित कार्यशाळा (e Content Development ( Digital Teaching Tools )) पुणे जिल्ह्यातील आय टी आय ( मुलींचे ), औंध -पुणे येथे चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये पुणे जिल्ह्यातील आय टी आय मध्ये कार्यरत असणा-या महिला शिक्षकांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. चंद्रकांत निनाळे , मा. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले . या प्रसंगी मा. कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
प्राचार्य मा.वागद्रे , यांनी अध्यक्षांचे स्वागत केले . तसेच या कार्यशाळेसाठी लाभलेले प्रशिक्षक श्री बाळकृष्ण सुर्वे, पूर्ण वेळ शिक्षक , लाल बहादुर शास्त्री काँलेज, सातारा यांचे स्वागत मा. निनाळे साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ स्वाती जव्हेरी यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. निनाळे यांनी कार्यशाळा घेण्यामागील प्रमुख हेतू स्पष्ट केला. महिला सक्षामिकारणा अंतर्गत बदलत्या युगाची पावले ओळखून शिक्षक पेशामधील महिलांना Digital Teaching क्षेत्रातही सक्षम करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना करून द्यावा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली .या नंतर प्रशिक्षक श्री बाळकृष्ण सुर्वे यांनी या कार्यशाळेत कोणकोणत्या विषयावर प्रशिक्षण देणार आहे याचा आराखडा सांगितला . व त्यानंतर कार्यशाळेस Hands On Training या पद्धतीने सुरुवात करण्यात आली .
या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून सौ स्वाती जाव्हेरी, आय टी आय, घोडेगाव-पूणे यांनी मोलाचे योगदान दिले.
मा.वागद्रे ,प्राचार्य, आय टी आय ( मुलींचे ), औंध -पुणे यांनी अद्यावत संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली . या मध्ये २५ संगणक इंटरनेट व LAN सुविधेसह उपलब्ध होते. यामुळे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी या मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यशाळे मध्ये खालील विषयावर प्रशिक्षण देणेत आले
- Google Apps : Google Drive , Docs , spreadsheet , slides, Forms, Google Classroom
- ब्लॉग तयार करणे
- Video recording साठी कोणकोणती अँप वापरावीत ?
- Power Point च्या सहाय्याने रेकॉर्डिंग कसे करावे
- Video Editing tools
- Youtube Channel कसा तयार करावा ?
- Yotube वर Video कसे Upload करत्तात ?
- Youtube Channel कसा कार्यरत ठेवतात ?
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर समारोपाच्या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थिनी प्रशिक्षण उत्तम झालेबाबत आपले मनोगत व्यक्त केले . तसेच प्रशिक्षण कालावधी थोडा अधिक हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली .
त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीना मा. निनाळे साहेब , सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . श्री जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांचे परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले
Nice..👌👌👌👌
ReplyDeleteThanks
DeleteNice👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteNice👌👌👍
ReplyDeleteअत्यंत समर्पक मांडणी
ReplyDelete👌👍👍nice report sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान ब्लॉग...
ReplyDeleteNice blog sir 👍
ReplyDelete