Digital Teaching Tools
व्यवसाय शिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा
मा . श्री निनाळे साहेब , सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे यांचे संकल्पनेतून सातारा जिल्ह्यामध्ये डिजिटल टिचिंग टूल्स या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि ०४/०१/२०२३ ते ०६/०१/२०२३ या कालावधीत करण्यात आले होते .
सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , पुणे व प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मा. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , सातारा यांचे मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात उत्साहात पार पडली .समन्वयक म्हणून श्री सुहास कुलकर्णी , एन बी देशमुख ज्यु कॉलेज , सातारा यांनी काम पहिले . प्रशिक्षक होते लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे व्यवसाय शिक्षक श्री बाळकृष्ण सुर्वे .प्रशिक्षणाचा लाभ सातारा जिल्ह्यातील २० शिक्षकांनी घेतला.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. रवींद्र भारती-झुटिंग, माजी नगर सेवक व सभापती , सातारा नगर परिषद सातारा हे होते. अध्यक्षस्थानी मा. डॉ आर व्ही शेजवळ , प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मानसी कदम यांनी मानले व आभार श्री संजीव चव्हाण यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेमध्ये विविध गुगल अँप्लिकेशन्स उदा contacts , calender , translator, Keep , Drive, Meet, chat, Doc, Sheet, Slide, Jamboard , blog, YouTube इ तसेच online Microsoft Office या अँप्लिकेशन्सचा उपयोगाचे प्रशिक्षण देणेत आले. याच बरोबर Video Editing , Screen Recording इ software वापरण्याचे प्रशिक्षण देणेत आले .
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा संजय पाटील , पाचार्य , श्री भवानी विद्यामंदिर व ज्यू. कॉलेज , सातारा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .अध्यक्ष म्हणून डॉ, आर व्ही शेजवळ लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा हे उपस्थित होते. सूत्र संचालन सौ मानसी कदम यांनी केले व आभार सौ दीपाली फल्ले यांनी मानले. या वेळी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण लाभदायक झालेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व उत्कृष्ट प्रयोगशाळा उपलब्ध करून दिलेबद्दल मा. प्राचार्य शेजवळ साहेब यांचे आभार व्यक्त केले .
अभिप्राय
Google Apps व विविध software चा वापर Educational field मध्ये, विद्यार्थ्यांची अभ्यासाबाबत आवड व आकलन शक्ति वाढविण्यासाठी तसेच वैयक्तिक डाटा स्टोअर कसा करायचा यांचे सुंदर व प्रभावी मार्गदर्शन training द्वारे श्री सुर्वे सरांनी केले. त्यांचे खूप आभार. Training चे आयोजन व नियोजन करणारे मा. श्री. निनाळे साहेब , मा. श्री. धुमाळ साहेब,प्राचार्य मा. शेजवळ सर, श्री. कुलकर्णी सर, श्री. Chavan sir , कदम मॅडम,कवारे मॅडम यांचे मनाासून खूप खूप आभार.
अनिता ताटपूजे
अभिप्राय :
कोणतीही व्यक्ती सेवानिवृत्ती च्या टप्प्यावर पोहोचली की अंग टाकते. अपवाद आहे सहसंचालक सोl. निनाळे सरांचा.....
शिक्षक वृंदाने भरपूर शिकावे, नव नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, जगा बरोबर वाटचाल करावी व updated राहावे व उर्वरित आयुष्यात कार्यरत राहून जमल्यास आर्थार्जन सुध्दा करावे या उदात्त हेतूने सहा वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करून आम्हास ही संधी प्राप्त करून दिली त्या बद्दल धन्यवाद. ट्रेनिंग मध्ये घेतलेले सगळं आम्हाला पचनी पडलं नसलं तरी ज्याला काहीच येत नव्हते त्याला 50% येवू लागले,ज्याला 50% येत होते त्याला 75% येवू लागले. किमान PC समोर बसून आपली बोटं कीबोर्ड वरून फिरावीत असे तरी वाटू लागले. आपल्या प्रेरणेने आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो याबद्दल श्री.चंद्रकांत निनाळे सरांचे व श्री.सचिन धुमाळ सरांचे आभार. तसेच लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ सरांचे कॉम्प्युटर लॅब व नवीन PC आम्हास उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद!
सहसंचालक सोl.चंद्रकांत निनाळे सरांच्या शब्दावर आम्हास Google व Microsoft चे ॲप्लिकेशन्स वापरण्याचे, YuoTube वर स्वतःचे व्हिडिओज अपलोड करण्याचे तंत्रज्ञान माफक मोबदल्यात शिकविल्याबद्दल प्रा. बाळकृष्ण सुर्वे सरांचे धन्यवाद !
तसेच प्रा.साळुंखे,प्रा.संजीव चवण, प्रा.कदम,प्रा. कवारे मॅडम व तीनही विद्यार्थिनींचे व सरतेशेवटी कार्यशाळेस उपस्थित माझ्या सहशिक्षकांचे आभार व सर्वांना धन्यवाद!
Sanjay Jagatap , Shivaji College, Satara
कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवसाय शिक्षण विभागातील सौ मानसी कदम , सौ. पल्लवी कवारे , श्री संजीव चव्हाण , नितीन साळुंखे , सौ दीपाली फल्ले , नजीर नदाफ यांनी परिश्रम घेतले .
l
Comments
Post a Comment